मुंबई – महागाईच्या काळात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला आहे, तर चांदीने महागाईचा झेंडा उंचावत नवा दबाव निर्माण केला आहे. गुडरिटर्न्सनुसार आज सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,10,660 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,01,450 इतका आहे. मात्र, चांदीने मोठी किमतीत उसळी घेतली असून, एक किलो चांदीचा भाव ₹1,29,000 इतका झाला आहे.
गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती, मात्र आता ती मोठ्या झेप घेऊन महागाईकडे वाटचाल करत आहे. आर्थिक तज्ञांनी भारत आणि अमेरिकेतील टॅरिफ वॉरवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच भूराजकीय संकटावरही मार्ग काढला जाणार असल्याचे संकेत आहेत.
आजचे अपडेटेड भाव (इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार)
24 कॅरेट सोनं – ₹1,09,100 प्रति 10 ग्रॅम
23 कॅरेट सोनं – ₹1,08,660 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोनं – ₹99,930 प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट सोनं – ₹81,820 प्रति 10 ग्रॅम
14 कॅरेट सोनं – ₹63,820 प्रति 10 ग्रॅम
चांदी – ₹1,24,499 प्रति किलो
शुद्ध सोन्याची ओळख कशी कराल?
सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क प्रमाणित असणे अनिवार्य आहे.
24 कॅरेट सोने – ‘999’ अंक
22 कॅरेट सोने – ‘916’ अंक
21 कॅरेट सोने – ‘875’ अंक
18 कॅरेट सोने – ‘750’ अंक
14 कॅरेट सोने – ‘585’ अंक
हे चिन्हे ग्राहकांना सोन्याची शुद्धता सिद्ध करतात आणि सुरक्षित खरेदीची हमी देतात.
सोनं आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील आणि स्थानिक सराफा बाजारातील फरक लक्षात घेऊन बदलत असतात. वायदे बाजारात शुल्क नाही, तर सराफा बाजारात शुल्क व कर समाविष्ट असतो.
read also :https://ajinkyabharat.com/vikrami-10-thousand-kattas/