विक्रमी १० हजार कट्टे हळद एकाच दिवशी!

राज्यातील सर्वाधिक हळद आवक करणारी बाजार समिती ठरली

रिसोड :वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुका आता मसाले वर्गीय पिकातलं महत्त्वाचं केंद्र म्हणून उभं राहिलं आहे. विशेषतः हळद उत्पादनासाठी हे क्षेत्र राज्यात अग्रगण्य बनलं आहे. ११ सप्टेंबर रोजी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाच दिवशी विक्रमी दहा हजार कट्टे हळदची आवक झाली, तसेच उच्च दर रु.१२४००/- प्रति क्विंटल प्राप्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

रिसोड बाजार समितीचे सभापती श्री. विष्णुपंत भुतेकर, माजी सभापती आणि सध्या संचालक गजाननराव पाचरणे, सचिव विजयराव देशमुख आणि इतर गणमान्य संचालक व हमाल यांनी याबाबत केलेल्या सततच्या प्रयत्नांनी आणि पुढाकारामुळे आज रिसोड बाजार समिती राज्यातील अव्वल हळद आवक असलेल्या बाजार समित्यांच्या यादीत शिखरस्थानी पोहोचली आहे.

पूर्वी शेतकरी हळदीची विक्रीसाठी शिरडशहापुर, सांगली, वसमत आणि हिंगोलीसारख्या दूरच्या बाजारपेठेत जावे लागत होते, जेथे जास्त वेळ आणि खर्च येत होते. मात्र, सभापती विष्णुपंत भुतेकर यांच्या पुढाकारातून आठवड्यात दोन दिवस (गुरुवार व सोमवार) हळद खरेदीसाठी निश्चित करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेतूनच चांगला दर मिळण्यास मदत झाली आहे.

११ सप्टेंबर रोजी सुमारे पाच हजार क्विंटल (१० हजार कट्टे) हळदची विक्रमी आवक झाल्यामुळे राज्याच्या बाजार समिती वेबसाईटवर रिसोडची नाविन्यपूर्ण कामगिरी उल्लेखली गेली आहे. यामुळे शेतकरी वर्गाला न्याय्य दर आणि सुलभ सुविधा मिळण्यास हातभार लागला असून उत्पादन विक्रीला वाव निर्माण झाला आहे.

सभापती विष्णुपंत भुतेकर यांचे म्हणणे :“हे विशेष हळद उत्पादक शेतक-यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून सतत प्रयत्नरत आहोत. आजची विक्रमी हळद आवक आणि उच्च दर हा नक्कीच शेतकरी वर्गासाठी आधारस्तंभ ठरणार आहे.”

सचिव विजयराव देशमुख यांचे म्हणणे :“रिसोड बाजार समितीतील येणाऱ्या शेतकरी वर्गाचे हित जोपासत आमचे कार्य सतत सुरू आहे. राज्यात हळद आवक मध्ये रिसोड बाजार समिती प्रथम क्रमांकावर आहे, हे आमच्या प्रयत्नांचे फळ आहे.”या प्रकारामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य समाधान मिळण्यास सक्षम होत असून, रिसोड बाजार समिती हे महाराष्ट्रातील हळद उत्पादकांच्या सशक्त केंद्रांपैकी एक ठरत आहे.

read also :https://ajinkyabharat.com/delhi-polisancha-shocked-busted/