नई दिल्ली – दिल्ली पोलिसांनी एक धक्कादायक दहशतवादी प्लॉट उधळून दिला आहे. आयएसआयएसच्या (ISIS) दोन दहशतवाद्यांचा मुंबईत मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा डाव होता. पोलिसांच्या विशेष तपासातून आफताब अन्सारी आणि सुफियान अबुबकर खान या दोघांना दिल्ली रेल्वे स्टेशनवरुन मुंबईला निघण्याच्या अगोदर अटक करण्यात आली.
आफताब आणि सुफियान हे मुंबईचे रहिवासी असून, त्यांनी हरियाणातील मेवात परिसरातून स्फोटके व शस्त्रास्त्रे खरेदी केले होते. या दोघांकडून 3 पिस्तूल तसेच मोठ्या प्रमाणात काडतूस आणि आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांनी सोशल मीडियाचा वापर करून पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या संपर्कातून कट्टरतावादी विचार प्रसारित करत तरुणांना भरती करण्याचा प्रयत्न केला होता.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आणि केंद्रीय एजन्सींनी देशभरात छापे टाकून एक मोठा ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून, पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या पाच दहशतवाद्यांमध्ये दोन दिल्लीचे तर एक-एक मध्य प्रदेश, हैदराबाद आणि झारखंडमधील रांची येथील आहेत.
विशेष म्हणजे, अशरफ दानिश हा भारतातून या दहशतवादी नेटवर्कचे नेतृत्व करत होता. त्याच्या रांची येथील लपण्याच्या ठिकाणावरून देशी बनावटीचे पिस्तूल, स्फोटक साहित्य, तांब्याचे पत्रे, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, लॅपटॉप, मोबाईल्स आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा उद्देश भारतात मोठ्या प्रमाणात हल्ले करणे आणि समाजात सांप्रदायिक द्वेष पसरवून धार्मिक सलोखा भंग करणे हा होता. त्यामुळे भारताची सुरक्षा मोठ्या संकटात येण्याची शक्यता होती. या धक्कादायक कारवाईमुळे देशातील सुरक्षा यंत्रणेला मोठा हातभार लागला असून आरोपींचा उलगडा केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/thackeray-bandhunchi-secret-meeting/