मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना पलटवार;
अकोला, ११ सप्टेंबर – मराठा आंदोलनाचे अग्रेसर आणि समाजकार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. छगन भुजबळ यांनी “लोकशाही आहे, जरांगेशाही नाही” असे वक्तव्य केले होते, त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी ठणठणीत टीका करत म्हटले की, “दुष्ट विचाराचा नेता ओबीसीला नेता लाभला आहे. वेगळे चॉकलेट देऊन नेते कामाला लावतो.”जरांगेंच्या मते, मराठा समाजाने लोकशाही मार्गाने आपले प्रश्न मांडले असून, त्यांना आरक्षणाच्या बाबतीत मागे घेण्याचेही आव्हान दिले आहे. “आम्ही पहिलेच ओबीसी यादीत आहोत, आरक्षणाचा हिस्सा आहे. तरीही मागे घेण्याचा दबाव कसा?”, असा सवाल त्यांनी केला.या दरम्यान त्यांनी आरक्षण GR च्या संदर्भात सरकारला प्रश्न विचारले, “१८० जातींचा समावेश साडेचारशे जातीमध्ये कसा झाला? हे सरकारने स्पष्ट करावे.” तसेच त्यांनी छगन भुजबळ यांना थेट निशाणा साधत म्हटले, “तू काय कमी पुढारलेला आहेस का? तुमच्या प्रत्येक गावात जमिनी आहेत. आम्ही जातीवादी नाही, आम्ही समाजासाठी लढतोय.”जरांगे यांनी सरकारला सुद्धा टोला लगावला, “तुमच्यासारख्या मंत्रीमंडळांनी ओबीसी समाजाला वेड्यात काढलं आहे. आता जर आमचं चॅलेंज केलं नाही, तर १९९४ चा GR आम्ही चॅलेंज करू.” त्यांच्या या वक्तव्यांनी वाद अजूनच तापले आहे.छगन भुजबळ यांनी मात्र म्हटले होते, “जर कोणता मोर्चा पुन्हा रस्त्यावर उतरला तर ओबीसी समाजही ग्रामीण पातळीवर मोर्चे काढत आहे. आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. त्यामुळे इथे जरांगेशाही येणार नाही.”या वादग्रस्त संवादामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय निर्माण झाला असून, आगामी काळात यावर अधिक तापलेले संघर्ष उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/azhad-hind-navdurga-utsav-mandalachi-adhawa-meeting/