मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेत शेतकऱ्यांचा रोष; मंत्री समोर निवेदन सादर
मलकापूर (कैलास काळे) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत ग्रामविकास ग्रामपंचायत व पंचायतराज सशक्तीकरण कार्यक्रमाचा उद्देश ग्रामपंचायतींमधील विकास कार्याची माहिती देऊन ग्रामविकासात जनतेचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा आहे. याच अभियानांतर्गत मलकापूर विधानसभा मतदारसंघात मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बेलाड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत केंद्रीय रक्षा मंत्री युवकल्याण व क्रीडा भारत सरकार रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले असतानाच मलकापूर व नांदुरा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध मोठा रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांनी केंद्रीय व राज्य मंत्र्यांसमोर आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक प्रफुल्ल पाटील यांच्याकडून होणारी कोट्यावधींची फसवणूक थांबवावी आणि आरोपीविरुद्ध त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी केली.शेतकऱ्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षांपासून आरोपीविरुद्ध कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे त्याची मालमत्ता विक्रीसाठी निर्बंधही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरून न दिल्याने लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याची तयारी सुरू असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते, जे फसवणुकीच्या दुर्दैवी घटनेमुळे आर्थिक व मानसिक तणावाखाली आहेत.मंत्र्यांनी संबंधित पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी आरोपीविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यास आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास त्वरीत आदेश द्यावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनीही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले.शेतकरी आत्महत्येच्या भीतीत व हवालदिल स्थितीत असून, प्रशासनाकडून न्याय मिळवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. आगामी काळात प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे, अन्यथा समाजिक व जनसामान्यांच्या हक्कासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी केली जाईल, असा निर्धार कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/mukhyamadhiyanchaya-garu-kamachi-chowkashi-sathi-unanim/