Beed crime : माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात खळबळजनक ट्विस्ट

पूजा गायकवाड आणि राजकारण्यांचा संशयित सहभाग !

बीड – गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांचा मृत्यू पुन्हा खळबळ उडवणारा ठरला आहे. दीड वर्षांपासून नर्तकी पूजा गायकवाड (वय 21) यांच्यासोबत गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते. परंतु अलीकडच्या काळात या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पूजा गायकवाड यांनी गोविंद बर्गे यांच्याकडे त्यांचा बंगला आपल्या नावावर करण्याची मागणी केली होती; नाकारल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे आरोप आहेत.सोमवारी रात्री गोविंद बर्गे बार्शी तालुक्यातील पूजाच्या घरी गेले होते, तर मंगळवारी सकाळी तिच्या घरासमोरच गाडीत त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी आत्महत्या असल्याचे सांगितले; मात्र बर्गे यांच्या नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्येचा नसून कट रचलेला असल्याचा दावा केला आहे.

भाच्याचे आरोप:

गोविंद बर्गे यांच्या भाच्याने म्हटले, “माझा मामा निर्व्यसनी होता, त्याच्याकडे कधीही बंदूक नव्हती. काही राजकीय लोकांनी माझ्या मामाची आणि पूजा गायकवाडची ओळख करुन दिली आणि कट रचला. गाडीत दारुच्या बाटल्या ठेवून आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

तपासणीची सविस्तर माहिती:

  • मृतदेहाच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरून डाव्या भागातून बाहेर पडल्याची नोंद.

  • पोलिस आता शवविच्छेदन अहवालावरून निष्कर्ष काढणार आहेत.

  • पूजा गायकवाड हिला अटक करण्यात आली असून तिला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील गूढ आणि राजकीय कनेक्शनमुळे बीडमध्ये खळबळ कायम आहे. पुढील चौकशीतून कोणते रहस्य बाहेर येईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/vishwas-bundghar-balambal-wattle/