“Bigg Boss 19: कुनिका सदानंदच्या मुलाने केला धक्कादायक खुलासा

जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड होते

 कुमार सानूसह आईच्या नात्यावर भाष्य”

मुंबई – बिग बॉस 19 मध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री कुनिका सदानंद आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक कुमार सानू यांच्याबाबत आता कुनिकाचा मुलगा अयान सदानंद यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.सिद्धार्थ कन्नन यांच्या यूट्यूब पॉडकास्टमध्ये बोलताना अयान म्हणाला, “जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझ्या आईचेही बॉयफ्रेंड होते. काही चांगले नवरे होते, तर काही चांगले वडील.” अयानच्या या वक्तव्यानं सर्वांचे लक्ष वेधले आहे.अयानने कुमार सानूसोबतच्या आईच्या नात्यावरही भाष्य केले. त्याने सांगितले, “कुमार सानू यांना मी कधी भेटलो नाही, पण त्यांच्या मुलांशी मी वेळ घालवला आहे. माझ्या आईने त्यांना माझ्या लाइफ पार्टनरप्रमाणे पाहिले. ती त्यांच्या कलेवर प्रेम करते, व्यक्तीवर नाही. हे प्रेम प्रत्येकाला एकदा तरी मिळालं पाहिजे.”पूर्वीच्या मुलाखतीत कुनिकानेही कुमार सानूसह नात्याबाबत बोलताना सांगितले की, “आम्ही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसायचो जेव्हा शोसाठी परफॉर्म करायचो. मी त्यांना माझा नवरा मानायचे, पण नंतर काही गोष्टींमुळे माझा प्रेमभंग झाला.”अयानच्या खुलाशानंतर कुनिका सदानंदच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चांना नवीन वळण मिळाले आहे आणि चाहते या गोष्टीवर प्रतिक्रिया देत आहेत.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/20-fatanchak-dhakkadayak-khadda-campus/