35 गावांमध्ये पाणंद रस्त्यांची गुप्त पाहणी सुरु

गावांमध्ये

बार्शीटाकळी – महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत तालुक्यातील 35 गावांमध्ये पाणंद रस्त्यांची शिवार फेरी सुरू झाली आहे. हा अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून (17 सप्टेंबर 2025) ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर 2025) महसुल पंधरवाड्याच्या अंतर्गत राबवला जाणार आहे.सदर पाहणी जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. या कामामध्ये तालुक्यातील ग्राम महसुल अधिकारी (तलाठी), ग्रामसेवक, महसुल सेवक (कोतवाल), पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिक सहभागी आहेत.गावातील पाणंद रस्ते, शेत रस्ते, शिवरस्ते, पायवाट यांची नोंद घेऊन प्राथमिक यादी तयार केली जात आहे. ही यादी ग्रामसभेत मान्यता मिळाल्यानंतर (17 सप्टेंबर रोजी) अंतिम स्वरूपात घेऊन भूमी अभिलेख विभागाकडून सिमांकन केले जाईल आणि अतिक्रमण असल्यास निष्कासित केले जाईल. प्रत्येक रस्त्याला विशिष्ट सांकेतिक क्रमांक देण्यात येईल.तालुक्यातील पहिल्या टप्प्यात ही फेरी तहसिलदार राजेश वझीरे आणि नायब तहसिलदार अक्षय नागे यांच्या नेतृत्वाखाली राबवली जात आहे. नागरिकांनी सहभाग नोंदवून शेतरस्त्यांसंदर्भातील माहिती ग्राम महसुल अधिकाऱ्यांकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/akola-health-issue-garju-rugananaparya-facility/