अकोला – राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सखोल आढावा घेतला. त्यांनी गरजू रूग्णांना आरोग्य सुविधा पोहोचवण्यावर विशेष भर दिला आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांची क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री आबिटकर बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.मंत्री आबिटकर म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंशावरील लस आणि आवश्यक औषधं उपलब्ध असूनही रुग्णांना शहरात येणे भाग पडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुविधा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.त्यांनी गर्भलिंगनिदान व तपासण्या, ट्रॉमा केअर सेंटर स्थापनेसाठी प्रस्ताव, आयुष्मान भारत योजना गरीबांपर्यंत पोहोचवणे यावरही विशेष निर्देश दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक सुसज्ज ठेवण्याचे आणि रुग्णालयातील अस्वच्छतेची दुरुस्ती करण्याचेही आदेश त्यांनी दिले.शिवापूर येथील रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करत मंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदारीची जाणीव करून दिली.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/akola-super-specialty-hospitals-milit/