अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्ण त्रस्त

आरोग्यमंत्री उपस्थितीतही गोंधळ

अकोला – राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अकोला शहरात असतानाही शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना गंभीर त्रास भासत असल्याचे समोर आले आहे.कर्करोगाने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला सिटी स्कॅनसाठी पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत, तर रुग्णासाठी लागणारी औषधे उपलब्ध असतानाही रुग्णाला अनेक दिवसांपासून परत पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या पती शैलेश ताठे यांनी केला आहे.हॉस्पिटलमध्ये जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. औषधांचा साठा संपल्यानंतर मागणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते, मात्र मागणी न केल्यामुळे रुग्णांना आवश्यक औषध पुरवठा केला गेला नाही. अनेक दिवस औषध नसल्याने रुग्णांना परत पाठवण्यात येत आहे.आजही रुग्णाला बोलावण्यात आलं, परंतु फक्त नवीन तारीख देऊन परत पाठवण्यात आलं. आरोग्यमंत्री स्वतः उपस्थित असताना रुग्णांना होत असलेला त्रास आणि आरोग्य विभागाची निष्क्रियता गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/telhara-shahetil-deepamala-shende-yana-bhavuk-nirop/