तेल्हारा शाळेतील दीपामाला शेंडे यांना भावूक निरोप

शाळेच्या हृदयाची दीपस्तंभ

तेल्हारा – तालुक्यातील पंचायत समिती तेल्हारा येथील जिल्हा परिषद शाळेत मागील सहा वर्षांपासून कार्यरत शिक्षिका दीपमाला शेंडे यांना शासन आदेशानुसार बदली होत असल्याने शाळेत भावूक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, कर्मचारी, पालक, गावकरी आणि अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. सहा वर्षांपूर्वी शेंडे मॅडम बाभुळगाव येथील शाळेत रुजू झाल्या, त्या वेळी गावातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय होती. मात्र, त्यांनी अडचणींना तोंड देत पवित्र ज्ञानदानाचे कार्य हाती घेतले आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी शहरात गेले. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण, गीत गायन आणि भाषण स्पर्धा यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यात आला.ताईंनी दररोज अंदाजे 50 किलोमीटर प्रवास करूनही आपल्या कर्तव्याची निष्ठा दाखवली आणि शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांमध्येही विश्वास आणि कर्तव्यनिष्ठेची जाणीव निर्माण केली.निरोप समारंभात सरपंच मीनाक्षी ताई कोकाटे, उपसरपंच विजय इंगळे, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि अनेक शिक्षक, विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते. निरोप घेताना सर्व उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले, आणि ताईंना भावपूर्ण अलविदा म्हणण्यात आला.

READ ALSO :  https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojne-motha-dilsa/