रिसोड- तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेत रस्ते व पाणंद रस्ते यासंदर्भातील तक्रारी व समस्या त्वरित सोडविण्यासाठी एक महत्त्वाची शेतकरी संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभा प्रतीक्षा तेजनकर, तहसीलदार रिसोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून पोलीस निरीक्षक रिसोड, पोलीस स्टेशन शिरपूरचे पोलीस निरीक्षक, उपअधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय रिसोड आणि इतर संबंधित अधिकार्यांची उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या महसूल सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत दिनांक २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रत्येक मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व समाधान शिबीराचा विशेष आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या अंतर्गत दिनांक २९ व ३० सप्टेंबर २०२५ रोजी शेतकरी जनसंवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांना आपापल्या शेत रस्ते व पाणंद रस्ते यासंबंधी तक्रारी प्रशासनाशी थेट मांडता येतील. या सभांमध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या अडचणींना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित उपाय मिळवावा, असे आवाहन प्रतीक्षा तेजनकर, तहसीलदार रिसोड यांनी केले आहे.
शेतकरी बांधवांनी आपले तक्रारीपत्र तयार ठेवावे आणि दिलेल्या दिवशी तहसील कार्यालय, रिसोड येथे उपस्थित राहावे. प्रशासनाची तातडीने कारवाई करण्याची हमी दिली गेली असून, स्थानिक विकासासाठी व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या संवाद सभेचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/e20-fuel-fuel-vaccine-is-the-petrol-lobby/