मुंबईर – केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी E20 फ्यूल विरोधात सोशल मीडियावर पसरलेल्या टीकेवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “ही टीका कुठल्या तांत्रिक समस्येमुळे नाही, तर श्रीमंत आणि शक्तीशाली पेट्रोल लॉबीने पसरवलेला प्रोपेगेंडा आहे.” गडकरी म्हणाले की, “माझ्याविरोधात एक पेड कॅम्पेन चालवला जात आहे.”
E20 फ्यूलमध्ये 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल असते. सरकार याला ग्रीन एनर्जी ट्रांजिशनसाठी महत्त्वाचे पाऊल मानते. मात्र काही सोशल मीडियाच्या युजर्सकडून मायलेज कमी होण्याची, इंजिनवर परिणाम होण्याची अफवा पसरवली जात आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ई20 फ्यूल वापरल्यामुळे वाहनांच्या मायलेजवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. मंत्रालयाने E0 फ्यूल पर्याय परत आणण्याचा पर्याय मागे ढकलला आहे.
गडकरींचे पुढचे मोठे उद्दिष्ट : ऊर्जा आत्मनिर्भरता आणि पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान
गडकरी म्हणाले, “हे तंत्रज्ञान भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणार आहे, तसेच प्रदूषण कमी करण्यात मदत करेल.” त्यांनी सांगितले की, देशातील स्टार्टअप्स सोडियम आयन, लिथियम आयन, जिंक आयन व एल्युमिनियम आयन बॅटरीवर रिसर्च करत आहेत. जुन्या वाहनाच्या स्क्रॅपिंगमधून रेअर अर्थ मेटल्स व इतर मेटल्स काढता येतील.
सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीत आत्मनिर्भर भारताचे पहिले पाऊल
गडकरी यांनी आठवले की, काही वर्षांपूर्वी भारत सेमीकंडक्टर चिप्ससाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून होता. त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला होता. आता मात्र भारतात चीप निर्मिती सुरु झाल्यामुळे हे क्षेत्र आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. भविष्यात हेच तंत्रज्ञान इंधन व बॅटरी सेक्टरमध्येही विस्तारेल.
ऑटोमोबाईल क्षेत्राचा प्रगतीचा ग्राफ
गडकरी म्हणाले की, पेट्रोल-डिझेल वाहनांची मागणी लगेच कमी होणार नाही. दरवर्षी ऑटोमोबाईल प्रॉडक्शनमध्ये 15-20 टक्के वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजार खूप मोठा असल्यामुळे पर्यायी इंधन व तंत्रज्ञान हळूहळू स्वतःच स्थान मजबूत करेल.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/mi-konatyahi-groupcha-bhaag-nahi/