मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोणी अरब आरोग्य उपकेंद्रात दि. १० सप्टेंबर रोजी क्षयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात हॅन्ड हेल्ड एक्स-रे मशीनद्वारे क्षयरोग संशयितांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकूण १५४ संशयितांची एक्स-रे तपासणी केली तसेच ४५ रुग्णांचे थुंकी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
मार्गदर्शन व सहकार्य
या शिबिरास डॉ. पांडुरंग ठोंबरे (DHO), डॉ. कावरखे (CS), डॉ. परभणकर (DTO), डॉ. बेले (DMO), डॉ. नांदे (THO) यांचे मार्गदर्शन लाभले.
याशिवाय डॉ. प्रियांका गोमाशे, डॉ. राधिका बियाणी, CHO डॉ. अभिलाषा लकडे, आरोग्य सहाय्यक संजय धाडसे, सौ. सविता राठोड, देवेंद्र चंद्रशेखर, योगेश म्हातारमारे, सौ. ज्योत्स्ना मते, गटप्रवर्तक सौ. देवरे व सौ. जोंधळेकर, परिचर मनिष जाधव, वाहनचालक गणेश राऊत, वैभव महल्ले तसेच सर्व आशा कार्यकर्त्या यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
यशस्वी आयोजन
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच सौ. शगुप्ता परवीन शराफत अली यांनी विशेष सहकार्य केले.
शिबिराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले होते.
आरोग्य शिक्षण
या शिबिराला मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. परभणकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांना आरोग्य शिक्षण दिलं.
read also :https://ajinkyabharat.com/tarunana-chithwani-india-migration-jhakir-naikala-aidschi-lagan/