नाशिक-नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘जेन झी’ वर्गाकडून सरकारविरोधात हिंसक आंदोलन सुरू आहे. पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींना आग लावण्यात आली असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
किरण मानेंची वादग्रस्त पोस्ट
किरण माने यांनी फेसबुकवर लिहिलं –
“भक्तडुक्कर पिलावळींनो, नेपाळ बघताय नं? आपल्याकडे फरक इतकाच असेल की, रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही पिसले जाणार. सुट्टी नॉट.”
या पोस्टमधून त्यांनी भाजप समर्थकांना थेट टोला लगावला.
भाजपचा संताप, तक्रार दाखल
या पोस्टविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कडून सायबर पोलीस ठाण्यात किरण माने यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
त्यांच्यावर लोकशाही व्यवस्थेविरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणारी पोस्ट लिहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मानेंचं प्रत्युत्तर
वाद वाढल्यानंतरही किरण माने यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं. त्यांनी आणखी एका पोस्टमध्ये लिहिलं –
“माझ्या पोस्टवर चारशे कमेंट्स. भक्तडुक्कर पिलावळ म्हणे, घाबरला. कमेंट्स ऑफ ठेवल्यात. अरे बुळग्यांनो, तुपकट मेंगळ्यांना घाबरायला तुम्ही ट्रम्प आणि मी फेकू आहे का? पण तुमचा कार्यक्रम फिक्स.”
नेपाळमधील परिस्थिती तणावपूर्ण
दरम्यान, नेपाळमधील आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला असून, 300 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. काठमांडूमधील भारतीय दूतावासाने नागरिकांना खबरदारीचा इशारा देत नेपाळला प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.
read also :https://ajinkyabharat.com/pahalgamamadhye-mahilachanam-kunku-pusalya-galeam-bjp-visarla/