अंबाशी (जि. अकोला) –अकोला जिल्ह्यातील अंबाशी येथे कौटुंबिक वादातून नातेवाईकांनी मिळून एका जावयाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पातुर पोलिसांनी अवघ्या एका तासात तपासाची चक्रे फिरवत दोन महिला आणि एका युवकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत व्यक्तीचे नाव नागेश गोपनारायण असे असून, तो आपल्या मोठ्या मेहुणीच्या घरी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यांपासून नागेश आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे त्यांची पत्नी सासरी राहत होती.
पत्नीची चौकशी करण्यासाठी नागेश जेव्हा मोठ्या मेहुणीच्या घरी गेला, तेव्हा त्याने मोठी आणि लहान मेहुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या वादात मोठ्या मेहुणीचा मुलगा हस्तक्षेप करण्यासाठी पुढे आला आणि त्याने रागाच्या भरात घराजवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने व तीक्ष्ण हत्याराने नागेशच्या डोक्यावर व पाठीवर जोरदार वार केले.
या हल्ल्यात नागेश रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुप्त माहितीच्या आधारे केवळ एका तासात आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या प्रकरणात दोन महिला आणि एका युवकाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
read also:https://ajinkyabharat.com/juna-raga-dokyavar-dagad-maroon-youth/