जुना राग डोक्यावर! दगड मारून युवक जखमी

डोक्यावर

रिसोड : जुना राग मनात धरुन एकाने गोटा डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता रिसोड लोणी मार्गावर पेट्रोल पंपा समोर घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजू मदन पवार राहणार अमरदास नगर रिसोड यांनी रिसोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते 10 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान रिसोड लोणी मार्गाने जात असताना पेट्रोल पंपा समोर भीमराव शेषराव शिरसाट राहणार अमरदास नगर हा त्या ठिकाणी आला व जुना राग मनात धरून शिवीगाळ करत मुठ गोट्याने डोक्यावर मारून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत संजू मदन पवार यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.याप्रकरणी रिसोड पोलिसांनी भीमराव शेषराव शिरसाट याचे विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/imd-weather-update-angle/