भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे १७ जिल्ह्यांना हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
कोणते जिल्हे हाय अलर्टवर?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संभाव्य परिस्थिती
वादळी वारे (प्रति तास ३० ते ४० किमी वेगाने)
विजांचा कडकडाट
निचांकी भागांत पाणी साचण्याची शक्यता
पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका
नागरिकांसाठी सूचना
गरज असेल तरच घराबाहेर पडा.
नद्या, नाले आणि धोकादायक भागांपासून दूर रहा.
प्रशासनाकडून दिलेल्या सूचना पाळा.
शेती, वाहतूक आणि वीज पुरवठा यावर परिणाम होऊ शकतो, याची काळजी घ्या.
देशातील इतर भागातही पाऊस
उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा येथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज.
ईशान्य भारतातील मेघालय, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि नागालँड येथे मुसळधार पाऊस.
दक्षिण भारत आणि गोव्यातही पावसाचा इशारा.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन हायअलर्टवर असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/hamasachaya-aadyavanwar-international-rajkarnachi-adjirable/