वाशिम जिल्हा व आंतरजिल्हयातील चोरी करणारी टोळी जेरबंद ८,२५,०००/- रू. किंमतीच्या १२ मोटार सायकली जप्त
वाशिम:-गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशन रिसोड हददीतून मोटार सायकल चोरी जाण्याच्या घटना घडल्याने पोलीस स्टेशन रिसोडचे ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण यांनी डी.बी.पथकास मार्गदर्शन करून चोरांचा शोध घेवून मोटार सायकल हस्तगत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून डी. बी. पथकाने तांत्रिक व आधूनिक पध्दतीने तपास करून व मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक ०९/०९/२०२५ रोजी संशयित इसम नामे १) मयुर प्रविण नवले, वय २१ वर्षे, रा. माणूसकी नगर, ता. रिसोड, जि. वाशिम २) गजानन उर्फ गणेश बळीराम गायकवाड, वय १८ वर्षे, रा. माणूसकी नगर, ता. रिसोड, जि. वाशिम यांना ताब्यात घेवून त्यांना चोरी गेलेल्या मोटार सायकलीबाबत कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यांनी वाशिम व बुलढाणा जिल्हयातून मोटार सायकली चोरी केल्याची कबूली दिली. त्यानंतर नमूद आरोपी यांचेकडून पोलीस स्टेशन रिसोड, पोलीस स्टेशन वाशिम शहर, पोलीस स्टेशन मेहकर, जि. बुलढाणा, पोलीस स्टेशन लोणार, जि. बुलढाणा इत्यादी ठिकाणच्या एकूण १२ मोटार सायकल किंमत ८,२५,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.तसेच या चालू एका महिन्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, चोरी, पोलीस बतावणी व फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून एकूण १,९६,५००/- रू. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला होता. अशाप्रकारे आतापर्यंत एका महिन्यात रिसोड पोलीसांनी चौथी धडाकेबाज कार्यवाही करून आतापर्यंत १०,२१,५००/- रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, मा. सहायक पोलीस अधीक्षक, वाशिम श्री नवदिप अग्रवाल (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हवालदार प्रशांत राजगुरू, संजय रंजवे, आशिष पाठक, पोलीस अंमलदार रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे, सुनिल तिवाले, प्रविण गोपनारायण, विश्वास चव्हाण यांनी केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/gor-banjara-samajacha-reservation-question-petla-mehkarat-dhadkle-shekado-bandhav/
