आज आपण पाहणार आहोत नवनियुक्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या संदर्भातील माहिती कोण आहेत सीपी राधाकृष्णन, तामिळनाडूतील ज्येष्ठ नेते व चार दशकावून अधिक काळाच्या सार्वजनिक जीवनाचा अनुभव असलेले श्री चंद्रपूरम पोनुसामी राधाकृष्णन यांचा जन्म चार मे 1957 रोजी तामिळनाडू तिरुप्पुर येथे झाला त्यांनी व्यवसाय प्रशासन विषयात पदवी घेतली आहे विद्यार्थी अवस्थेत ते टेबल टेनिसचे विजेते ठरले होते तसेच लांब पल्ल्याच्या शर्यतीत क्रिकेट आणि हॉलीबॉल मध्येही त्यांना आरास आहे, 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली यापूर्वी त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून दीड वर्ष कार्यभार सांभाळला होता झारखंडच्या कार्यकाळातही त्यांना राष्ट्रपतींनी तेलंगणाचे राज्यपाल आणि बुद्ध चेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या 1974 या वर्षी अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून आपल्या राजकीय जीवनात सुरुवात केली . त्यानंतर ते भाजपमध्ये विविध पदांवर काम करत राहिले त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली 1998 व 1999 मध्ये कोयंबतूर मतदारसंघातून ते सलग दोनदा लोकसभेत निवडून आले खासदार म्हणून त्यांनी संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद सुद्धा भूषवले तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम समिती वित्त मंत्रालय सल्लागार समिती व शेअर बाजार घोटाळा चौकशी समिती वर त्यांनी काम पाहिले. 2004 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताचे संसदीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी भाषण केले 2004 ते 2007 दरम्यान त्यांनी भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहले. या काळात त्यांनी 19 हजार किलोमीटर लांबीची 93 दिवसाची रथयात्रा काढून नद्या जोड प्रकल्प ,समान नागरी कायदा, अस्पृश्यता निर्मूलन आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृती सुद्धा केली. 2016 मध्ये त्यांनी कोयर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली . त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची निर्यात विक्री 2532 कोटी रुपयांमध्ये पोहोचली. झारखंडचे राज्यपाल झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात त्यांनी राज्यातील सर्व 24 जिल्ह्यांना भेट दिली व नागरिकांशी थेट संवाद साधला त्यांच्या कार्यशाळेमुळे ते जनतेत लोकप्रिय झाले राधाकृष्णन हे पश्चिम तामिळनाडूतील ओबीसी गंडूर समाजातील आहे सध्या देशाच्या राजकारणात ओबीसी नेत्यांचे महत्त्व वाढले आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा मुद्दा पुढे आणला आहे अशा परिस्थितीत भाजपाचे राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवड करून ओबीसी समाजाला आपल्याकडे ठेवण्याचा स्पष्ट संदेश भारतीय जनता पार्टीने दिला आहे. उपराष्ट्रपतीपदी राधाकृष्णन यांची निवड ही एक केवळ व्यक्तीची नियुक्ती नसून भाजपाने साधलेले अनेक राजकीय समीकरणे आणि पुढील निवडणुकांच्या दृष्टीने आखलेली मोठी रणनीती मानली जात आहे.
जनसंघाच्या कार्यकर्त्यापासून देशाचे उपराष्ट्रपती

10
Sep