पातुर: शहरांमध्ये सकल ओबीसी संघटने कडून आरक्षण एल्गार मोर्चा दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सकल ओबीसी आरक्षण एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पातुर तालुक्यातील सकल ओबीसी बांधव उपस्थित होते. सकल ओबीसीच्या वतीने राज्यात उपोषण, धरणे ,मोर्चा ,साखळी ,उपोषण इत्यादी मार्गाने सरकारचे लक्ष सकल ओबीसी समाजाच्या मागण्याकडे वेधण्यात येत आहे. ओबीसीच्या वतीने राज्यात विविध मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब पातुर यांना देण्यात आले मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी. मुलामुलींसाठी असलेली ओबीसी शिष्यवृत्ती 100% मुलामुलींना देण्यात यावी ,महाज्योती संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी. म्हाडा व सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाचा समावेश करण्यात यावा. अनुसूचित जाती व जमाती प्रमाणे ओबीसी, वि.जा ,भ.ज ,व विशेष मागास प्रवर्ग शेतकऱ्यांना 100% सवलतीवर योजना राज्यात सुरू करण्यात याव्यात. महाराष्ट्र शासनाचा दिनांक 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय नुसार हैदराबाद गॅझेटियर मधील मराठ्यांच्या नोंदी विचारात घेऊन कुणबी प्रमाणपत्र देणारा शासन निर्णय त्वरित रद्द करावा. प्रत्येक शहर व तालुका स्तरावर ओबीसी, व्हीजेएनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय तयार करण्यात यावे. वगैरे मागण्यांचे निवेदन आज सकल ओबीसी बांधवांनी माननीय तहसीलदार पातुर यांना दिले व मराठा आरक्षणाचा विरोध केला.यावेळी गजानन बारतासे परसराम बंड राजेश गावंडे, अरविंद महल्ले, डॉक्टर ओमप्रकाश धर्माळ,बाळू वसतकार,राजेश नारायण आवटे, राजेश कीर्तने, शंकरराव बोचरे,सुरेंद्र उगले,गजानन इंगळे, राजेश भाकरे,प्रमोद गव्हाळे,छोटू काळपांडे,विजय आखरे,विजय बोचरे,प्रवीण इंगळे,विजय अंबुलकर, राजू उगले,धनंजय सिरस्कार, सचिन ढोणे, अतुल वसतकार,गणेश गाडगे,विनेश चव्हाण,सुनील गाडगे,बालू बगाडे, परसराम उंबरकर किशोर रौंदळे, जीवन ढोणे, सुभाष चिपडे, सचिन बारोकार,चंद्रकांत बारताशे,राहुल वाघमारे, ज्ञानदेव वाट, गजानन आल्हाट आधीसह बहुसंख्य उपस्थिती होती.
read also : https://ajinkyabharat.com/olya-shivarat-dadlela-deadly-deceit/