मुंबई: मंगळवारी सकाळी मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव गाडीने पोलीस हवालदार दत्तात्रय कुंभार यांना उडवले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वरळी सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉइंटजवळ व्हीआयपी बंदोबस्तासाठी पोलीस तैनात होते. या वेळी भरधाव गाडीने हवालदारावर धडक दिली. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे.
हवालदार दत्तात्रय कुंभार वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अपघातामुळे सी-लिंकवरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली. पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहेत.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/american-scientist-bharatachya-aramitar-motha-revealed/