अमेरिकेचे वैज्ञानिक भारताच्या आक्रमकतेवर मोठा खुलासा

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची घाबरगुंडी

 पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत जोरदार कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानचे अकरा एअरबेस उद्ध्वस्त झाले, किराना हिल्सवर मोठा स्फोट झाला आणि पाकिस्तानची लष्करी तयारी खालावली, असे अमेरिकेच्या वैज्ञानिकांच्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेचे वैज्ञानिक म्हणतात की, भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान स्वत:ला वाचवू शकला नाही आणि भारताला सडेतोड उत्तर देणे शक्य झाले नाही. पाकिस्तानने तरीही आपला पराभव कबूल केला नाही, मात्र त्यानंतर त्यांनी परमाणू कार्यक्रम वाढवण्यास सुरुवात केली आहे.

तत्पूर्वी भारत-पाक संबंध तणावग्रस्त झाले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले. या आक्रमकतेमुळे पाकिस्तानने अमेरिकेकडे मदत मागितली. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आणल्याचे सांगितले, परंतु भारताने यास खोटे ठरवले आहे.

नवीन अहवालानुसार, भारताच्या या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तानने भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी परमाणू कार्यक्रम वाढवला असून, अमेरिकेशी करार करत मोठा गेम खेळत असल्याचे दिसून येते. रशिया आणि चीन या काळात भारताच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची लष्करी तयारी खालावली असून, भारताच्या रणनीतीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण केला आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/chhagan-bhujbalacha-vidhan-maratha-reservation/