प्रकाश आंबेडकरांचा आरक्षणावर मोठा सवाल

मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याच्या निर्णयावर थेट विरोध

अकोला / मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्याच्या निर्णयावर कडाडून विरोध दर्शवला आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या जजमेंटचा दाखला देत त्यांनी म्हटले की, सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही आणि हा निर्णय कायद्याच्या विरोधात आहे.

मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती. राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाजात आनंद असताना, ओबीसी नेते विरोधासाठी मैदानात उतरत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या या निर्णयाला योग्य न्यायालयीन आधार नसेल्याचे ठळक केले आणि म्हटले की, मराठा समाजाचे ताट वेगळे असले पाहिजेत.

ते म्हणाले की, सत्तेत असलेले मराठा नेते गरीब मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करून भांडण निर्माण करत आहेत. भाजपने एकाच वेळी अनेक पक्षी मारल्याची टीका त्यांनी केली. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामुळे ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध वाढू शकतो, ज्यामुळे मनोज जरांगेंना धक्का बसू शकतो.

त्यांनी ओबीसींना राजकीय धोका ओळखण्याचा सल्ला दिला आणि मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र ताट आवश्यक असल्याचे पुनरुच्चार केले.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/chief-minister-devendra-fadnavis-yanchaya-chairmantekhali-cabinet-meeting/