नागपूर – राज्यभर कार्यरत चर्मकार ऐक्य परिषदेची शिखर आढावा बैठक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सालई (गोधनी) हुडकेश्वर रोड, रविदास धाम, नागपूर येथे संपन्न झाली. या बैठकीत वंचित-शोषित समाजावर अन्याय झाला तर आंदोलनाचा वणवा पेटविण्यात येईल असा निर्धार व्यक्त केला गेला.
मुख्य कार्यक्रम व घोषणाःश्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. समाजाचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव वरपे (सातारा) यांच्या अध्यक्षीय भाषणात समाजाची दशा व दिशा स्पष्ट करण्यात आली.
चर्मकार ऐक्य परिषदेचे अध्यक्ष उल्हास चंद्रकांत वरपे यांनी स्पष्टपणे सांगितले की – राज्यातील कुठेही वंचित-शोषित समाजावर अन्याय अत्याचार झाला, तर परिषद त्या विरोधात प्रचंड आंदोलन राबविण्यास सिद्ध आहे. सर्व शोषितांना परिषदेच्या कार्यकारणीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविदास धाम येथील बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज बांधवांनी मनपूर्वक आभार मानले.
साथच स्थानिक आमदार व खासदारांच्या प्रयत्नातून शासनाने रविदास धाम येथे सांस्कृतिक भवन उभारावे, अशी मागणी करण्यात आली. ऐक्य परिषद पूर्ण ताकदीने शासनाच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाहीही दिली गेली.
महाराष्ट्रभरातून तब्बल ७० संघटना प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार कल्पनाताई बसवेश्वर यांनी मानले.
प्रमुख उपस्थितीः
उल्हास चंद्रकांत वरपे (अध्यक्ष, चर्मकार ऐक्य परिषद)
दिलीप ढाकरे (उपाध्यक्ष)
पत्रकार विठ्ठल गजानन निंबोळकार
मधुकर शिखरे (दादर व्यापारी संघटना अध्यक्ष)
ज्ञानदेव वरपे (वरिष्ठ चर्मकार परिषद संघटक अध्यक्ष)
सुनील खाडे (RTI अधिकारी)
गजानन लवंगारे (भारत सरकार नेव्ही अधिकारी)
रणजित वाकळे (टीव्ही कलाकार)
सुधीर दस (अँडव्होकेट, हायकोर्टप्रकाश कुहिकर (सालाई ग्रामपंचायत सरपंच)
आणि अनेक सामाजिक, शैक्षणिक व राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
परिषदेचा इशारा:“वंचित-शोषित समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाचा वणवा पेटवू!”
उल्हास चंद्रकांत वरपे, अध्यक्ष, चर्मकार ऐक्य परिषद
READ ALSO :https://ajinkyabharat.com/shetkari-sangatnechi-central-ayush-minister/