ख्रिस गेलचा धक्कादायक खुलासा : पंजाब किंग्सकडून अपमान, आयपीएल स्पर्धेतील आक्रमक आणि सामर्थ्यवान फलंदाज ख्रिस गेलने एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. गेलने पंजाब किंग्सच्या संघावर खळबळजनक आरोप करत सांगितले की, त्याच्यावर अपमानास्पद वागणूक करण्यात आली होती. त्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता.
प्रकरणाची पार्श्वभूमी
2018 मध्ये पंजाब किंग्सने ख्रिस गेलला 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर संघात घेतले होते. गेलने 2021 पर्यंत पंजाब किंग्ससाठी खेळले, परंतु बायो बबलमुळे आयपीएल 2021 अर्धवट सोडावा लागला. यावेळी त्याला संघातून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप आहे. गेल म्हणतो की, केवळ फलंदाजीच नव्हे तर त्याच्या मानसिक स्थितीवरही पंजाब किंग्सने नकारात्मक परिणाम केला.
रडण्याची वेळ आली
ख्रिस गेलने एका मुलाखतीत सांगितले की, अनिल कुंबळे आणि संघाच्या पद्धतीमुळे तो मानसिकदृष्ट्या खचलो होता. तो इतका असहाय्य झाला की बोलतानाच रडू लागला. त्याने स्पष्टपणे सांगितले की, “पंजाब किंग्सने मला लहान मुलासारखे वागवलं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं वाटलं की मी नैराश्याकडे जात आहे.”
शेवटचा संवाद आणि निर्णय
गेलने अनिल कुंबळे यांच्याशी फोनवर बोलून आपली मानसिक स्थिती स्पष्ट केली आणि संघ सोडण्याचा निर्णय घेतला. “मी माझी बॅग पॅक केली आणि मुंबईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यानंतर तिथून निघून गेलो,” असं तो सांगतो.
मानसिक आरोग्याची काळजी आवश्यक
ख्रिस गेलच्या या खुलाश्यानंतर क्रीडा तज्ज्ञ आणि क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. आयपीएलसारख्या स्पर्धेत खेळाडूंच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कोणते धोके उद्भवू शकतात याचा मोठा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. अनेकांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली असून संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या भल्यासाठी सुधारणा कराव्यात, असा आग्रह करण्यात आला आहे.ख्रिस गेलच्या धक्कादायक अनुभवाने इंडियन प्रीमियर लीगच्या चमकदार दुनियेमागील अंधाऱ्या वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. संघ व्यवस्थापनाला आता खेळाडूंच्या मानसिक आणि व्यावसायिक गरजांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/kailas-patil-nationalist-sodun-shiv-sena-shinde-gatat-entry/