हिताची एनर्जी इंडियाचे शेअर 15 रुपयांवरून 18851 रुपयांवर!

1 लाख रुपयांपासून 12 कोटींपर्यंत!

Multibagger Stock : 15 रुपयांचा शेअर पाच वर्षांत 18851 रुपयांवर, 1 लाख रुपये झाले 12 कोटींवर!

मुंबई –हिताची एनर्जी इंडियाच्या शेअरने शेअर बाजारात जोरदार धमाका केला आहे. 2020 मध्ये या कंपनीचा शेअर फक्त 15 रुपयांवर ट्रेड होत असताना, आज त्याची किंमत 18851 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे पाच वर्षांत 1967 टक्के वाढ झाली असून गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट झाला आहे.जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी हिताची एनर्जी इंडियाचे 1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते, तर आज त्याचे मूल्य 12 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले असते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये 63.67 टक्क्यांची वाढ झाली आहे. आज स्टॉकने 19030 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

पहिल्या तिमाहीत कंपनीची दमदार कामगिरी

30 जून 2025 पर्यंत संपलेल्या पहिल्या तिमाहीत हिताची एनर्जी इंडियाचे निव्वळ नफा 1163 टक्क्यांनी वाढून 131.6 कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत नफा फक्त 10.42 कोटी रुपये होता.ऑपरेशन रेव्हेन्यू 1327 कोटी रुपयांवरून 1479 कोटी रुपयांपर्यंत वाढले असून EBITDA 224 टक्क्यांनी वाढून 155 कोटी रुपये झाला आहे.

टीप :

शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड आणि इतर गुंतवणूक क्षेत्र जोखमीच्या अधीन असतात. वरील माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे आणि गुंतवणुकीसाठी शिफारस नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/ruchira-palliaguruga-yancha-boat-discussion-issue/