अमेरिका आणि भारतामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी (NIV) नियम कडक केले आहेत. भारतातून व्हिसा अर्ज करणाऱ्यांना आता केवळ त्यांच्या देशात किंवा कायदेशीर निवासस्थानावरच मुलाखतीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.ही नवीन धोरणे सहा डिसेंबरपासून तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहेत. यामुळे भारतीय नागरिकांना आता इतर देशांच्या मदतीने अमेरिकेची अपॉइंटमेंट तातडीने घेता येणार नाही. कोरोना काळातही व्हिसासाठी वर्षे थांबावे लागत होते, परंतु आता ही व्यवस्था आणखी कडक झाली आहे.यामुळे व्यवसाय, पर्यटन व वैद्यकीय उपचार यांसाठी अमेरिका जाणाऱ्यांचे स्वप्न मोठ्या अडथळ्यात सापडण्याची शक्यता वाढली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/mosquito-nirmulanasathi-chinchkhed-khurd-gavat-extensive-favrani-abhiyan/