मुजफ्फरपूर – साक्रा विधानसभा मतदारसंघातील काटेसर पंचायतीतील मोहनपूर गावात मतदार यादीत मोठी गडबड समोर आली आहे. ५०० हिंदू कुटुंबे असून एकही मुस्लीम कुटुंब नसताना, निवडणूक आयोगाच्या सुधारित प्रारूप यादीत अनेक हिंदू कुटुंबांमध्ये अचानक मुस्लीम नावे दिसू लागली.कामेश्वर ठाकूर यांच्या सहा सदस्यीय कुटुंबात दोन, मैथुर ठाकूर आणि दिलीप ठाकूर यांच्या कुटुंबांमध्ये चार मतदारांसह मुस्लीम नावे जोडण्यात आली आहेत. गावकऱ्यांनी ही घटना साधी चूक नाही, तर मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप करत तक्रार करून चौकशीची मागणी करण्याची तयारी सुरू केली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/mahamargawar-jabri-chori-karnaya-ananjya-tolicha-polych-polysani-busted/