तेल्हारा नगरपरिषद मुख्याधिकारी विरोधात आमरण उपोषण

मनमानी कारभाराविरुद्ध सुईवालचे आमरण उपोषण

तेल्हारा- नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात, स्थानिक रहिवासी आणि शेतकरी संघटनांनी आज (८ सप्टेंबर २०२५) तेल्हारा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.उपोषणकर्ते नरेंद्र सुईवाल यांनी मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेकदा तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई किंवा चौकशी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर उपोषणाला सुरुवात करण्यात आली.उपोषणाच्या पहिल्या दिवशी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष गर्जी खोडके, स्थानिक व्यावसायिक आणि शहरवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की, मुख्याधिकारी यांच्या मनमानी निर्णयांमुळे नगरपरिषदेत प्रशासनिक अडचणी निर्माण होत आहेत आणि शहरवासीयांवर आर्थिक तसेच सामाजिक परिणाम होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी, अशी नागरिकांची आणि उपोषणकर्त्यांची एकमताची मागणी आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन, मुख्याधिकारीविरोधात कारवाई करणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/controversial-shet-rastyanchaya-nondisath/