मनोरा – राज्यातील शेतकऱ्यांसाठी पेरणी, कापणी, मळणी आणि शेतीमाल बाजारपेठेत पोहोचण्यासाठी बारमाही शेत रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे. यंत्रसामग्रीच्या वापरामुळे शेतीतील कामे जलद व सुलभ करण्यासाठी चांगल्या रस्त्यांची गरज वाढत आहे.राज्यात मूळ जमाबंदीवेळी आणि गटांच्या गाव नकाशांमध्ये अस्तित्वात असलेले ग्राम रस्ते, शिव रस्ते, गाडी मार्ग, पाय रस्ते इत्यादी दाखवलेले असले तरी, नंतर तयार झालेले नवीन रस्ते गाव दत्तरीत नोंदले नसल्यामुळे अनेक तक्रारी आणि अतिक्रमण उद्भवत आहेत.शासनाच्या निर्णयानुसार, तालुक्यातील विविध गावांमध्ये महसूल यंत्रणा या विवादित रस्त्यांचे वर्गीकरण, अधिकार अभिलेख नोंदी व रस्त्यांना क्रमांक देण्याचे काम करत आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कारखेडा येथे ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन शासन निर्णयाची माहिती देत, विवादित रस्त्यांचे कायदेशीरकरणासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी व मोजणी केली.
प्रत्यक्ष पाहणी व मोजणी:
कारखेडा ते विठोली, कारखेडा ते देऊळवाडी, कारखेडा ते चिखली, कारखेडा ते धानोरा, कारखेडा ते यशवंतनगर, कारखेडा ते कार्ली, रामतीर्थ ते कारखेडा, तळप ते कारखेडा, कारखेडा ते गलमगाव या शासकीय नकाशावर असलेल्या रस्त्यांची मोजणी स्थानिक कोतवाल, पोलीस पाटील आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी करून दाखवली.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आपले रस्ते कायदेशीर करण्याची संधी मिळणार असून, भविष्यात या रस्त्यांवर अतिक्रमण टाळण्यास मदत होईल.
read also : https://ajinkyabharat.com/st-reservation-banjara-samajacha-motha-conflict/