पर्यावरणपूरक बाप्पा आणि पारंपरिक विसर्जन मिरवणूक

पर्यावरणपूरक

आजकालच्या गडबडीत आणि डीजेचा कर्कश आवाज व लेझर लाईट्सच्या चकचकीत विसर्जन मिरवणूक हे नित्याचेच स्वरूप झाले आहे. मात्र मानोर्याच्या ‘मार्केटचा राजा’ मोरया गणेशोत्सव मंडळाने यावर्षी वेगळा आणि अनोखा पर्यावरणपूरक व पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

इको-फ्रेंडली गणेशमूर्ती:
मंडळाने शाडूच्या मातीची सुंदर इको-फ्रेंडली गणेशमूर्ती स्थापना केली. ही मूर्ती फक्त पर्यावरणपूरकच नव्हती तर ‘वारी’ थीमवर सजवलेली होती. त्यामुळे दर्शनार्थी भाविकांना पर्यावरण संरक्षणाचा संदेशही प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.साधेपणा आणि नैसर्गिकतेचा संगम असलेली ही मूर्ती सर्वत्र प्रशंसा झाली.

डीजेमुक्त आणि पारंपरिक विसर्जन मिरवणूक:
‘मार्केटचा राजा’ मंडळाने विसर्जन मिरवणुकीत डीजे व लेझर लाईट्सचा उपयोग टाळून हरिनामाचा गजर करत पारंपरिक स्वरूपाची मिरवणूक काढली.मिरवणुकीत ताल-मृदंगाचा जयघोष उत्साही पावलीअश्व व फुगडी खेळ सादर करून एक वेगळे वातावरण निर्माण केले गेले.उपस्थित नागरिक आणि पोलीस प्रशासनही या मिरवणुकीच्या पारंपरिक व शांततेच्या वातावरणाने मंत्रमुग्ध झाले.

पोलीस प्रशासनाकडून गौरव:
विसर्जन सोहळ्यात पोलीस प्रशासनाने मंडळाच्या कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला.
पोलीस अधिकाऱ्यांनी आवाहन केले:“इतर मंडळांनीही ‘मार्केटचा राजा’ मंडळाचा आदर्श घेऊन पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा.”

समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम:
‘मार्केटचा राजा’ मंडळाने फक्त गणेशोत्सव साजरा केला नाही, तर सामाजिक जबाबदारीची भूमिका पार पाडली.पर्यावरणाची काळजी घेणे आणि आपली सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व त्यांनी कृतीतून दाखवले.मंडळाच्या या उपक्रमामुळे भविष्यात अनेक गणेशोत्सव मंडळे पर्यावरणपूरक व पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करतील अशी समाजात आशा व्यक्त केली जात आहे.हा एक नवा आदर्श ठरणार आहे, ज्यातून समाजातील पुढील पिढीला सकारात्मक संदेश मिळणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/sansadhet-tarunani-entry-banana/