अकोला – पंतप्रधान पीक विमा 2024 अंतर्गत नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासोबत दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी, ज्यांना पीक विमा न मिळाला आहे, कमी भरपाई मिळाली आहे किंवा पोर्टलवर त्यांचा डेटा उपलब्ध नाही, त्यांना आपली तक्रार आयडी व विमा पावतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस एचडीएफसी अॅग्रो विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निवारण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले की, “जर या बैठकीतून तक्रारींचे योग्य समाधान न मिळाले, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना न्यायासाठी लढा देईल.” त्यांनी सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून न्याय मिळवण्यासाठी एकत्रितपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम एक मोठा दिलासा ठरणार असून, पीक विमा योजनेंतर्गत होणाऱ्या गैरव्यवस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी आपल्या दस्तऐवजांसह ठिक वेळेला बैठक स्थळी उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
read also :https://ajinkyabharat.com/eid-e-miladunnabi-for-adorable-mirvanuk/