मनभा येथे भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन सोहळा

फुगडी-झिम्मा आणि भजनी गीतांद्वारे जनप्रबोधन

मनभा  –गणेश विसर्जन सोहळ्यात श्री नागा बाबा गणेश उत्सव मंडळाने यंदा विशेषतः डीजे न लावता भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा साजरा केला. मनभा ग्रामस्थांनी पारंपरिक फुगडी, झिम्मा आणि दिव्यांग संघाच्या माध्यमातून म्युझिकल भक्ती गीत गायन करत, पुढच्या वर्षी लवकर परत येण्याचा संकल्प करत श्री गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

गणेशोत्सवाच्या शांत आणि श्रद्धेने भरलेल्या मिरवणुकीत महिलांची उपस्थितीही विशेष लक्षणीय होती. ग्रामस्थांनी वडगाव रंगे मार्गावरील धरणात विधिवत पूजन करून गणरायाचे विसर्जन केले. तसेच घराघरांत स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तींचे देखील सोयीनुसार विसर्जन करण्यात आले.

सदर सोहळ्यात ठीक कामठा चौकात महाप्रसाद वितरणाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात उपस्थित नागरिकांनी आनंदाने सहभागीता घेतली. शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद जाधव, मनभा बीड जमदार गब्बर पप्पू वाले आणि शामल सिंह ठाकूर यांनी चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

या भक्तिमय कार्यक्रमातून समाजात एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, डीजेच्या गर्दीतून भजन व पारंपरिक गीतांच्या माध्यमातून शांततेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला.

read also :https://ajinkyabharat.com/ayush-komkarwar-golibar-vaikunth-smashanbhumit-kadkot-police-settlement-antyasanskar/