पुणे – नाना पेठेतील परिसरात 18 वर्षीय आयुष कोमकरवर सोमवारी दुपारी गोळीबार करून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून ही घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मृतकाचे आई-वडील गणेश व कल्याणी कोमकर, जे नागपुर कारागृहात बंद आहेत, त्यांना अंत्यविधीसाठी पुण्यात आणण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गोळीबार केल्याप्रकरणी यश पाटील व अमित पाटोळे यांना पोलीसांनी अटक केली असून, आंदेकर टोळीचे प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याचे 13 साथीदार फरार आहेत. मृतक आयुष कोमकर महाविद्यालयात शिकत होता व गणेश विसर्जनाच्या आधीच्या दिवशी हा क्लासवरुन घरी आला होता. घटनास्थळी नऊ गोळ्या त्याच्या शरीरात शिरल्या आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.पोलीस आणि स्थानिक प्रशासन टोळीयुद्धाचा प्रसार रोखण्यासाठी सज्ज असून, या घटनेमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
आयुष कोमकरवर गोळीबार, वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

08
Sep