रिसोड शहरात ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य शांततामय मिरवणूक

सामाजिक ऐक्याचे प्रतीक! रिसोडमध्ये ईद मिलादुन्नबी भव्य मिरवणुकीत गर्दी

रिसोड – इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने रिसोड शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत शहरातील सर्व मुस्लिम बांधव एकत्रित होऊन सहभागी झाले.

सदर मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे मिरवणूक सुरळीतपणे पार पडली.

ईद-ए-मिलादुन्नबी 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण जगात साजरी केली जाते. गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणूक काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतल्यामुळे ही मिरवणूक आज काढण्यात आली.

read also :https://ajinkyabharat.com/sachndi-police-disclosure/