बळेगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय भवानी गणेशोत्सव मंडळ व ऋषिकेश चावरे मित्र परिवार यांच्या वतीने बळेगाव येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला. या शिबिरात जवळपास 30 युवकांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.सदर शिबिराचे आयोजन ऋषिकेश चावरे यांनी केले होते. रक्तदान संकलीत करण्यासाठी अकोला येथील डॉ. बी.पी. ठाकरे ब्लड बँक चे टीम उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या सर्व युवकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.शिबिरात सहभाग घेतलेल्या युवकांमध्ये ऋषिकेश अडमे, विठ्ठल चावरे, सुमित सोनवणे, अमोल खंडेराव, रोशन वाघ, मंगेश कुंजाम, सुरज कुयटे, गोवर्धन चावरे, अभी नाहटे, हर्षल सोनटक्के, दर्शन घोरमोडे, गौरव घोरमोडे, शितल टेकाडे, सुनिता वाघमारे, आदित्य टेकाडे, यश टेकाडे, जयवंत टेकाडे, जय मार्के, बबीता टेकाडे, दिपाली टेकाडे, प्रतिभा भारसाकडे, किरण भारसाकडे यांचा समावेश होता.कार्यक्रमाद्वारे युवकांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आणि गणेशोत्सवाच्या आनंदात मानवतेची खूण उमटवली.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/aalegava-yehe-mo-prophet-jayantiinimitta-blood-donation-shibir-92-youth/