अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शेगाव येथे भव्य कार्यक्रम; केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित

अण्णाभाऊ साठे जयंतीचा गौरव, रामदास आठवले यांचे प्रेरणादायी भाषण"

शेगाव: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शेगाव येथे मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य आणि महायुती जळगाव जामोद मतदारसंघाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशमुख मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, राणा दिलीपकुमार सानंदा, विजयभाप्पू देशमुख, विजय भालतडक, शरद शेठ अग्रवाल, नितीन शेगोकार, ज्ञानेश्वर आप्पा साखरे, सचिन धमाळ, प्रवीण मोरखडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत समाजसुधारणेतील योगदान उलगडून दाखवले. त्यांनी सांगितले, “अण्णाभाऊ साठे हे दलित, शोषित आणि वंचित घटकांचे खरे प्रतिनिधी होते. त्यांच्या साहित्याने आणि कार्याने समाजाला दिशा दिली.”आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय कुटे यांचे नेतृत्व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. “या नेत्यांच्या सहकार्यातून देश व राज्यातील सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार होत आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही वातावरणात पार पडला आणि उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची स्मृती उजळली.

READ ALSO :  https://ajinkyabharat.com/goodbye-ayan-robotics-technocratla-citizens/