चानी (पातूर तालुका): श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त चानी येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती व आठवडी बाजारामध्ये वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतो.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन दादा पाटील होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खरेदी-विक्री पातूर, चानी गावचे वैभव भागवताचार्य, ह. भ. प. प्रदीप जी महाराज ताले, संस्थापक अध्यक्ष श्री भक्ती साधना आश्रम चानी, किरण तायडे (सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर) आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान श्री शेतकरी राजा ग्रुपच्या सेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये रवि सोनोने, ज्ञानेश्वर गाडगे, प्रज्वल सोनोने, गणेश ताले, रामेश्वर जाधव, दीपक सोनोने, प्रणव चराटे इत्यादींनी वृक्षारोपण केले.श्री शेतकरी राजा ग्रुप या सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वेळोवेळी कार्यरत आहे. कार्यक्रमात सांगितले की, “आजची एक झाड म्हणजे उद्याचा आपला श्वास वाचविणे आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने एक झाड तरी लावावे, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखता येईल.”वृक्ष लागवड उपक्रमाद्वारे निसर्गाचा समतोल राखणे आणि शेतकऱ्यांसाठी पोषक पर्यावरण निर्माण करणे हा उद्देश साधला गेला. उपस्थित नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/%e0%a5%aa%e0%a5%aa-mandancha-participation-drone-cctv/
