“हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळवण्याची शेवटची संधी?

बंजारा समाजाचा आरक्षणासाठी तीव्र उठाव!

पोहरादेवी: मानोरा तालुक्यात गुरुवारी झालेल्या स्थानिक व तालुक्यातील बंजारा समाज बांधवांच्या बैठकीत, समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्यासाठी तीव्र आंदोलनाचे आवाहन करण्यात आले. रविवारी पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्रात अनेक मान्यवर उपस्थित राहून बंजारा समाजाने एकमताने आरक्षणासाठी उठण्याचे ठरवले.हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गाचे संपूर्ण लक्षणे परिपूर्ण करणारा असून, आंध्र व तेलंगणा राज्यांमध्ये त्यांना अनुसूचित जमातीचे वैध आरक्षण मिळाले आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील ठिकाणी देखील समान आरक्षण मिळविण्याची मागणी या बैठकीत केली गेली.बैठकीचे अध्यक्ष संजय महाराज होते. सभेचे प्रास्ताविक गोपाल चव्हाण व सूत्रसंचालन शाम राठोड यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सरदार राठोड, प्रा. वसंत राठोड, विलास राठोड, नंदू पवार, प्रेमसिंग महाराज चिखली, रमेश तुकाराम महाराज, अशोक चव्हाण, अभिजीत राठोड, प्रकाश राठोड, गुलाब जाधव, सुभाष महाराज, आशिष राठोड आदींनी बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार संविधानिक मार्गाने आरक्षण मिळवण्यासाठी काय करता येईल याबाबत आपापले विचार मांडले.अध्यक्ष संजय महाराज यांनी समाजाला सर्व प्रकारे पेटून उठून आरक्षण मिळविण्यासाठी समोर येण्याचे आवाहन केले. बैठकीत तालुका व राज्यभरातून आलेल्या समाज बांधवांप्रती आभार रोशन चव्हाण यांनी व्यक्त केले.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/risod-talukaye-shetkari-and-pick-display-helpline-suru-karanyachi-magani/