अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर)च्या दिवशी मुंबई आणि उपनगरात गणेश विसर्जनाचा उत्साह मोठ्या जोमात रंगला. मात्र, साकिनाका परिसरात गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी ट्रॉलीवर घेऊन जात असताना धक्कादायक घटना घडली. लटकलेल्या 11 हजार व्होल्टेजच्या हाय टेन्शन वायरचा स्पर्श मिरवणुकीच्या ट्रॉलीला लागल्याने ३६ वर्षीय बिनू शिवकुमार याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.या अपघातात तुषार गुप्ता (१८), धर्मराज गुप्ता (४४), आरुष गुप्ता (१२), शंभू कामी (२०) आणि करण कानोजिया (१४) यांचा गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तत्काळ पोलिस आणि स्थानिक बचाव कार्यकर्ते दाखल झाले.साकिनाका परिसरातील खैराणी रोडवरील श्री गजानन मित्र मंडळाची मिरवणूक सुरू असताना ही दुर्घटना घडली. प्रारंभिक तपासात असे दिसते की, टाटा पॉवर कंपनीची हाय टेन्शन वायर ट्रॉलीला लागल्यामुळे हा अपघात झाला.आतापर्यंत प्रशासनाने सुरक्षा उपायांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, भविष्यात अशा दुर्घटना
READ ALSO : https://ajinkyabharat.com/barsheetaki-shahar-ganesh-visarjan-mirvnukeet-tanav/