बार्शीटाकळी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तणाव

पोलिस-मंडळ कार्यकर्त्यांमध्ये वाद

अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणावपूर्ण घटना घडली. पोलिस आणि मिरवणूक घेतलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांनी पोलिसांनी विनाकारण मारहाण केली असल्याचा आरोप केला असून, यामुळे काही काळ विसर्जन मिरवणूक थांबवावी लागली.घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून, मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत करण्याचे काम सुरु आहे. या तणावामुळे परिसरात नागरिकांमध्ये चिंता पसरली होती. पोलिसांनी परिस्थिती शांत करण्यासाठी उपाययोजना राबवली असून, पुढील काही वेळात मिरवणूक पुन्हा सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/wahtuk-polisankdoon-notification-issued/