नागपूर शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी
नागपूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील जड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात येणार असून, यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार, सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत शहरात ट्रक, ट्रेलर, डंपर, कंटेनर अशा मोठ्या जड वाहनांना प्रवेश बंदी असेल. शहरातून बाहेर जाणाऱ्या ट्रकसाठी आउटर रिंगरोड वापरणे बंधनकारक केले गेले आहे.ही नियमावली ८ सप्टेंबरपासून महिन्याभर लागू राहणार आहे. तसेच, नियम मोडल्यास वाहनधारकांवर १० हजार रुपयांचा दंड होईल, अशी स्पष्ट सूचना पोलिसांनी दिली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/hake-pandit-supporter-face-to-face-atmosphere/