इराणमध्ये आंतरराष्ट्रीय निर्यातीत मोठा यश

ग्रामीण शेतकऱ्यांसाठी नवे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दालन उघडले!

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब चिंतामणी येथील केळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पदार्पण करत आहेत. प्रगतिशील शेतकरी रफिक कुरेशी यांच्या पिकांचे साईराम एक्स्पोर्ट कंपनीमार्फत इराणमध्ये पहिल्यांदाच निर्यात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी साईराम एक्स्पोर्टचे मालक हनुमंत खबाले व दीपक मंजुळे यांनी विशेष सहकार्य प्रदान केले आहे, तर मॅग्नस फार्मचे तुषार नलवडे यांनी देखील यासाठी मोलाची मदत केली आहे.

सध्या पर्यंत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पिक देशातील पुणे, मुंबई व इतर शहरांपर्यंतच पोहोचत होते, मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी ग्रामीण शेतकऱ्यांसमोर खुली झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना नव्या मार्गावर चालना मिळाली असून, योग्य मोबदला मिळून त्यांची समृद्धीकडे वाटचाल सुरु झाली आहे.

हे यश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असून आता ते स्वतःचे उत्पादन जागतिक बाजारपेठेत कसे विकायचे याकडे लक्ष देऊ शकतील. साईराम एक्स्पोर्टचे मालक हनुमंत खबाले म्हणाले, “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले पिक पाठवण्याची संधी ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन पर्व ठरणार आहे. यामुळे केवळ उत्पन्नात वाढ होणार नाही, तर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनण्याची दिशा सुद्धा प्राप्त होईल.”

आता शेतकऱ्यांनी याच्या मदतीने दीर्घकालीन योजना आखून आपली उत्पादने जागतिक बाजारपेठेत विकण्याची तयारी करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील या संधीचा फायदा घेऊन उत्पादन वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/mahayuti-sarva-kahi-alabel/