स्व.राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्ग

अकस्मात मृत्यूने हादरलेल्या पालकांना दिलासा

तेल्हारा -हिवरखेड येथील नामांकित सहदेवराव भोपळे विद्यालयातील स्व. अनिकेत संजय मरोदे आणि स्व. रेश्मा रविन गोटे या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पालकांसाठी सुखद बातमी आली आहे.अनिकेत मरोदे यांचा अपघातानंतर पाण्याच्या डोहात मृत्यू झाला तर रेश्मा गोटे यांचा राहत्या घरी सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर शाळा प्रशासन आणि महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली स्व. राजीव गांधी अपघात विमा सानुग्रह योजनेअंतर्गत पालकांना लाभ मिळवण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला.नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून योजनेअंतर्गत तीन लाख रुपये निधी मृत्युमुखी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रदान करण्यात आला. पालकांनी या निधीबाबत समाधान व्यक्त केले आहे.विद्यार्थ्यांच्या पालकांना लाभ मिळवून देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश इंगळे व माजी केंद्रप्रमुख प्रकाश राऊत यांनी योग्य ते पाऊल उचलले. संस्थेच्या वतीने संस्था कार्यवाह श्यामशील भोपळे आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश खोब्रागडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक आरिफ शेख, विभाग प्रमुख स्नेहल भोपळे, मुख्याध्यापक संतोषकुमार राऊत, लाभार्थी पालक संजय मरोदे, रविन गोटे, दयाराम कासोटे, प्रा. शंकर दुनघव, प्रा. मयूर लहाने, प्रा. गणेश भोपळे आणि प्रफुल भगत हे उपस्थित होते.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/come-hyikartat-dad-maganar/