ब्रिटिश CPS टीमचा दौरा आणि मोठा अपडेट समोर

विजय माल्या-नीरव मोदी तिहारमध्ये?

नवी दिल्ली – भारताच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली विदेशात पळून गेलेल्या हायप्रोफाईल आरोपी विजय माल्या आणि नीरव मोदी लवकरच तिहार तुरुंगात मुक्कामाला असतील. ब्रिटनच्या काऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (CPS) टीमने नुकतेच तिहार तुरुंगाला भेट दिली असून तिथल्या सोयी-सुविधा, सुरक्षा व्यवस्था याची बारकाईने पाहणी केली आहे.

 CPS टीमचा भारत दौरा: चार सदस्यांच्या या पथकात दोन CPS तज्ज्ञ आणि ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाचे दोन अधिकारी यांचा समावेश होता. त्यांनी तिहार तुरुंगाच्या अत्यंत सुरक्षित आणि संवेदनशील वॉर्डची बारकाईने पाहणी केली. तसेच काही कैद्यांशी संवाद साधला आणि तुरुंग प्रशासन व भारतीय अधिकाऱ्यांसोबत प्रत्यार्पण प्रक्रियेवर मनमोकळी चर्चा केली.

तिहार तुरुंगावरील प्रश्नचिन्हविजय माल्या आणि नीरव मोदी यांनी ब्रिटिश न्यायालयासमोर याचिकाद्वारे तिहार तुरुंगात प्रत्यार्पण न करण्याची विनंती केली होती. त्यांच्या युक्तीवादानुसार, भारतातील तुरुंगात हिंसा आणि असुरक्षेची भीती असल्याचे म्हटले गेले होते. या मागणीनुसार, ब्रिटिश न्यायालयाने मानवाधिकारांची पूर्तता करण्यासाठी CPS टीम भारतात पाठवली आहे.

 भारत सरकारचा विश्वास: भारतीय अधिकाऱ्यांनी ब्रिटिश CPS टीमला आश्वासन दिले आहे की, प्रत्यर्पित आरोपींना तिहार तुरुंगात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले जाईल. गरज पडल्यास, त्यांच्यासाठी विशेष एनक्लेव तयार करण्याची व्यवस्था देखील केली जाईल.

 पुढील प्रक्रिया काय? आता भारत-युनायटेड किंगडम दरम्यान या प्रलंबित प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरू आहे. CPS टीमच्या दौऱ्यामुळे ब्रिटिश न्यायालयात भारताच्या प्रत्यार्पण प्रक्रियेचे विश्वासार्ह दस्तऐवज सादर करता येतील, असे समजते.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/r/