लालबागच्या राजाचे विसर्जन यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून

गणेश विसर्जनाचा ऐतिहासिक क्षण

मुंबई – यावर्षी लालबागच्या राजाचे विसर्जन एका नवीन व अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने गर्दी असतानाच लालबागच्या गणेशबाप्पाच्या भव्य मूर्तीला समुद्रात विसर्जनासाठी एका स्वयं-चालित यांत्रिक तराफ्यावरून नेण्यात आले.ही विशेष यंत्रणा वापरल्यामुळे समुद्रात बोटीची गरज नाही, तराफा स्वयंचालित असून तो सुलभपणे समुद्रात नेण्यात आला. या नव्या तंत्रज्ञानामुळे विसर्जन सोयीस्कर व सुरक्षितपणे पार पडले.या भव्य कार्यक्रमात देशातील अत्यंत प्रतिष्ठित उद्योगपती अनंत अंबानी सुद्धा उपस्थित होते. सोबतच उमरखाडीचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या मोठ्या गणेश मूर्तीही विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी येथे दाखल झाल्या होत्या.मुंबई पोलीस आणि कोस्टगार्ड यांनी समन्वय साधून संपूर्ण कार्यक्रम सुरक्षेच्या दृष्टीने तणावमुक्त आणि सुव्यवस्थित पार पडावा याची दक्षता घेतली.यंदाच्या विसर्जनाने गणेशोत्सवाच्या पारंपरिक स्वरूपात आधुनिकतेचा नवसुर जोडल्याचे दिसून आले असून, लोकांच्या उत्साहात भर पडली आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/akola-patur-rhodwar-fierce-unruly/