अकोला पातूर रोडवर भीषण अपघात

गणेश विसर्जनानंतर दुचाकी-चारचाकी वाहनात जोरदार धडक

अकोला – पातूर-अकोला रोडवर गणेश विसर्जनानंतर दुर्दैवी अपघात घडला आहे. जय बजरंग गणेश उत्सव मंडळाचे सदस्य विसर्जनाचा कार्यक्रम संपवून परतताना त्यांच्या वाहनाचा समोरून आलेल्या दुचाकी वाहनाशी जोरदार धडक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या अपघातात राम चंद्र आंधळे (वय अंदाजे 30) यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर राहुल खोंड, विनोद डांगे आणि रवींद्र उर्फ विक्की माळी हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी अकोल्यातील शिवसेना वसाहत, बजरंग चौक परिसरात राहणारे असल्याची माहिती मिळाली आहे.अकोला पातूर रोडवरील या भीषण अपघातात दुचाकी व चारचाकी वाहन यामध्ये जोरदार धडक झाल्यामुळे दुचाकी गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.सध्या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलीस विभाग पुढील तपासात गुंतले असून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे.नागरिकांनी अधिक काळजी घेऊन वाहन चालवावे व नियमांचे पालन करावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

READ ALSO :http://ajinkyabharat.com/kumbh-rashi-aaplya-aaplya-usable-use/