अकोट – श्रीजी कॉलनी येथील सेंट पॉल्स अकॅडमीत शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वयंशासन आयोजन करण्यात आले. यावेळी वर्ग १० वी, ५ वी आणि ६ वी चे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतले. शाळेच्या मुख्याध्यापकांपासून ते इतर कर्मचाऱ्यांपर्यंतच्या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडून प्रशासनिक सेवेचा अनमोल अनुभव घेतला.स्वयंशासनात मुख्याध्यापकाची भूमिका अंतरिक्ष मंगळे, उपमुख्याध्यापिकेची जान्हवी महल्ले यांनी केली. आनंदी बनावडे पर्यवेक्षक तर नमिता चंडालिया व जान्हवी धारपवार यांनी देखरेखीची जबाबदारी सांभाळली.स्वयंशासनानंतर शिक्षक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे कुमकुम तिलक व सरस्वती आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. स्वागतगीत सादर करणारे डॉ. अर्चना रायबोले, योगेश चेडे आणि विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची सुरुवात केली. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.जाई तायडे, कृष्णाली मुऱ्हेकर आणि गौरी बरेठिया यांनी शिक्षक दिनाच्या महत्त्वावर आपले मनोगत व्यक्त केले. सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन व भेट देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या भूमिकेत असलेल्या विद्यार्थ्यांचेही सन्मान करण्यात आले.वैशाली देशपांडे यांनी कविता सादर केली, तर दहावीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून उत्साहवर्धन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनीत लखोटिया यांनी प्रबोधनात्मक भाषण केले तर प्रमुख अतिथी संस्था उपाध्यक्ष लुणकरन डागा, सचिव प्रमोद चांडक, शारदा लखोटिया व रेखा चांडक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आभार प्रदर्शन करण्यात आले.मुख्याध्यापक विजय बिहाडे व उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी यांनी शिक्षकांच्या योगदानावर मार्गदर्शन केले. संचालन विद्या नळे, आनंद काळमेघ, अश्लेषा सावरकर, धनश्री सोळंके, ज्ञानेश्वरी शेटे, नियती वानखडे, प्राजक्ता वाकोडे यांनी केले. आभार प्रदर्शन नितीन गावंडे व सिद्धी भगत यांनी केले.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/daru-piychi-asal-tar-ghari-tamba-pradeep-khareracha-citizen-emotion/