शिक्षक खरंच काय…?
शिक्षक खरंच काय असतो?
लेकराचा माय बाप असतो,
प्रेमाचा पाझर असतो,
ज्ञानाचा सागर असतो,
लंगड्याचा पाय असतो,
अंधाचा प्रकाश असतो,
विकासाचा पाया असतो,
वट वृक्षा सम असतो,
शिक्षक असतो आयुष्य घडवणारा
न थांबणारा.. न संपणारा…
कवी:
प्रा.प्रज्ञानंद थोरात
९८२२६७४४८७